आर्यजीत : उदय विश्वनायकाचा

ही माझी पहिली रोमांचक कादंबरी आहे. Genre: फँटसी

आर्यन पाचगणी शहरात आपल्या कुटुंबासह आनंदी जीवन व्यतीत करत होता. शाळेत जाणे, मित्रांसोबत मजा करणे यामध्ये त्याचे दिवस मस्त चालले होते. पण अचानक स्कूलच्या गॅदरिंग मध्ये असे काही विचित्र घडते ज्यामुळे आर्यनला एका नवीन विश्वाचा शोध लागतो. जगामध्ये नकारात्मक विचारांनी ग्रस्त झालेले लोक नवीन काळसैनिक बनतात आणि एका मोठ्या काळ्या शक्तीचे गुलाम बनतात हे त्याला समजते. आर्यन, एक तेरा वर्षाचा मुलगा, कसा सामना करतो या शत्रूचा? त्याच्या जन्मजात लाभलेल्या अद्भुत शक्तिचा भल्यासाठी कसा उपयोग करतो? आणि तो काही नवीन शक्ती प्राप्त करतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक वाचल्यावरच मिळू शकतील.

ईबुक सध्या उपलब्ध आहे.